Wednesday, 16 March 2016

सफर तामिळनाडु / कर्नाटकची - बंदिपुर (भाग ६)

अनेक कारणांमुळे (सरळ सरळ टंकाळा म्हणता येत नाही म्हणुन...) पुढचा भाग लिहणे झाले नाही. माझ्या लेखांची चातकासारखी वाट पाहणार्या वाचकांनो.. हा घ्या पुढचा भाग!! ;)
.
.
.

ह्या वेळेस आता वाघाची वाट पहायची नाही असा मी पक्का निश्चय केला आणि डोळे मिटुन बसले. माझ्या निश्चयाला कसे धमाकेदार सुरुंग लागणार होते ते थोड्याच वेळात कळणार होतं!! 

बंदिपुर हे तामिळनाडु - कर्नाटक बॉर्डर वरचं अभयारण्य. उटी वरुन म्हैसुरकडे जाताना मदुमलाईच्या जंगलातुन रस्ता जातो. जाताना रस्त्यात हत्ती दिसणे तर नित्याचे आहे. पण ह्या जंगलात वाघही आहेत. नशिबात असेल तर वाघही दिसुन जातो. वाघ ह्या प्राण्याने माझ्या डोक्याला किती ताप दिलाय हे मला चांगलं लक्षात असुनही मी बंदिपुरला मुक्काम ठरवलाच. वाघापेक्षाही तिथे जंगलात रहाण्याची सोय होती हे जास्त भारी होतं. कान्हामध्ये हा अनुभव न मिळाल्याने जंगलातला मुक्काम असतो तरी कसा हे पहायची उत्सुकता होती. 

Tuesday, 15 March 2016

वारी अमेरिकेची - भाग २ (ऑस्बल चाझम, व्हाईटफेस माऊंटन, हाय फॉल्स गॉर्ज)

दुसर्‍या दिवशी सक्काळी शिस्तीत उठलो. आदल्या रात्री नीट काही न खाल्ल्याने कडकडून भूक लागली होती. कॉम्प्लिमेंटरी नाश्ता खुणावत होता. मी नाचत बागडत कॅफेटेरियात गेले. आता एवढ्या सकाळी थंड वातावरणात नाश्ता म्हणजे कसं गरम वाफाळतं सांबार आणि त्यात डुंबणार्‍या इडल्या, किंवा उडीद वडे!! अहाहाहा.... विचारानेच अजून भूक खवळली. उड्या मारत जाऊन पाहिलं तर काय, थंडगार डोनट्स, ब्रेड आणि आंबट ज्युस. हुडुत....! 

वारी अमेरिकेची - भाग १ (सिक्स फ्लॅग आणि लेक जॉर्ज)

नमस्कार मंडळी!
मागच्या वर्षी नवरोबा कृपेने आमचे पाय अमेरिकेच्या पुण्यभूमीला लागले. इथल्या पावन अनुभवांवर एक विस्तृत लेखमाला येतच आहे (थांबा..थांबा..असे पळू नका!!). हा मात्र न्यूयॉर्क शहराच्या बाहेर पडून केलेल्या एकमेव भटकंतीचा वृत्तांत! 

तर त्याचं झालं असं की २ महिने अमेरिकेत राहायचं म्हणून आधी मनमोर पिसारा फुलवून थुईथुई नाचत होता. त्यामुळे फारच उत्साहात आजूबाजूचं सगळंच दणादण पाहून घेतलं. मग लक्षात आलं की अजून जवळपास एक महिना शिल्लक आहे. न्यूयॉर्कच्या बाहेर जाउन काही बघता येईल का ते शोधू लागले. नवर्‍याने वॉशिंग्टन अक्षरशः पिंजून काढलं होतं आणि मलाही आता अमेरीकेतल्या उंच इमारती आणि संग्रहालये पाहून भयानक कंटाळा आला होता. "अमेरिकेतला निसर्ग असतो कसा? ह्यांच्या डोंगर दर्‍या दाखवा तरी." असं म्हणून वॉशिंग्टन वगैरे काही न पाहता सरळ अपस्टेट मध्ये काय पहाता येईल ह्याचा धांडोळा घ्यायला सुरुवात केली.