ब्लॉग विषयी

नमस्कार लोक हो!

माझ्या झाडाखाली आपले स्वागत आहे.

दुनियेतल्या लाखो करोडो लोकांसारखी मी सुद्धा आयुष्याच्या धावपळीत अडकलेली व्यक्ति आहे. कधी कधी ह्या आयुष्याचा काम वैताग येतो तेव्हा निवांतपणा शोधायला हे माझं झाड!

मी काही फार जग फिरलेले नाही. पण जे काही थोडं फार पाहिलंय, अनुभवलंय.. ते हल्लीच इथे लिहुन ठेवायला सुरवात केली आहे.

ह्या ब्लॉगवर तुम्हाला मुख्यत: प्रवासवर्णनेच दिसतील. सध्या मी निवडकच ठिकाणांबद्दल लिहीलेले आहे. ब्लॉगमध्ये सर्वात वर तुम्हाला मेनु बारमध्ये ठिकाणांची नावे दिसतील. त्यावर क्लिक करुन तुम्ही त्या भटकंतीवरचे सर्व लेख वाचु शकता.

प्रवासवर्णना व्यतिरिक्त मी अधुन मधुन टाकलेले तुऱ़ळक लेखही आहेत. ब्लॉगमध्ये उजव्या हाताला लेबल्स मध्ये तुम्ही "कविता", "परीक्षण" इ. मधुन ते लेखही पाहु शकता.

बाकी काही नाही तरी किमान तुमच्या सहलीचा बेत आखायला तरी नक्कीच हा ब्लॉग मदत करु शकेल अशी आशा!

No comments:

Post a Comment