माझं न नवर्याचं एक तत्व आहे.. समजा पैसे असतीलच.. तर माणसानी दुनिया पहावी.. बावळट सारखं घराला डेकोरेटच करणं, इंटीरियरच करणं ह्या सारख्या क्षुद्र गोष्टींवर पैसे घालवु नयेत.. आता ह्या वाक्यातली मुदलातली "समजा पैसे असतीलच तर.." हीच अट पुर्ण होत नसल्याने आम्ही पुढच्या भागाकडे कधी वळलोच नाही..! पण तरी वर्षातुन एकदा "कुठे तरी जायला हवं राव" नावाचा किडा वळवळतो..आणि मग लोक कसं ऋण काढुन सण साजरा करतात.. तसं आम्ही ऋण काढुन भटकायला जातो..! तसंही पैसा नाही म्हणुन कुरकुरायचय.. असंही कुरकुरायचय.. मग किमान दुनिया भटकुन मग घरी येऊन कुरकुरू..!
सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी (२०१४) नोव्हेंबरात "कुठे तरी जायला हवं राव" डोकं वर काढु लागले.. त्यातच दिर कोइंबतुरला असल्याने "जाऊन तर पाहु" असा सुर लागु लागला.. बॅकग्राऊंड म्युझिक म्हणुन "खड्ड्यात गेली शिंची नोकरी.. चला आता कुठेतरी" चा भुंगा गुणगुणत होताच.. आणि सरते शेवटी आजपासुन बरोब्बर १५ दिवसांनी आठवड्याभरासाठी तामिळनाडुत जाऊ असा ठराव पास करण्यात आला. (अर्थातच तत्काळ तिकिट काढायला लागणार असल्याने, "बॅगा तर भरुन ठेवु, मिळालं तिकिट तर जाउ, नाही मिळालं तर बसु घरीच" असा उपठरावही पास केला गेला!)
मला हातातली कामं धामं सोडुन ट्रिप प्लान करायची कित्ती कित्ती आवड आहे हे इकडच्या स्वारींना माहित असल्याने स्वारी माझ्यावर सर्व सोपवुन, तिकडेच तोंड करुन निघुन गेली.. तिजोरीतला खडखडाट पहाता "बजेट टुर" फक्त मीच प्लान करु शकते (जन्मतःच देणगी म्हणुन मिळालेल्या कंजुसी वॄत्तीमुळे!!) हा स्वारींचा विश्वास मी लवकरच सार्थ ठरवला..! केवळ एक सप्ताहात ९ दिवसांची, ५ माणसांची सहल केवळ अर्ध लक्ष रुपयांमध्ये बसवुन दाखवली..!
ह्या एका सप्ताहात मी झोपेत सुद्धा ट्रिप अॅडव्हायझर वर माहिती काढत होते, तामिळनाडुत फोन करुन "अय्यो राम पाप्पं.." च्या टोन मध्ये बोलत होते..हापिसातल्या तमिळ लोकांकडुन बेसिक संभाषण शिकत होते.. तामिळनाडु आणि कर्नाटकाच्या स्टेट ट्रन्सपोर्टच्या कस्टमर केअरला शुद्ध मराठीत प्रश्न विचारुन छळत होते..
जन्मोजन्म आपण तामिळनाडुतच राहिलो आहोत इतक्या आत्मविश्वासाने मी लोकांना पुढचा प्लास दिला..
पुणे - रामेश्वरम / धनुषकोडी- मदुराई - कोइंबतोर - कुन्नुर - बंदिपुर - म्हैसुर - पुणे (व्हाया बंगलोर)
आता हा रुट असाच का? हेच सर्वात जास्त सोयीच की अजुन काही? मग कोडाई करावं की उटी? की कुन्न्नुरलाच २-४ दिवस मुक्काम टाकावा? असे अनंत प्रश्न तुम्हाला पडु शकतात. ह्या सर्वांचे उत्तर "मला माहिती नाही" हे आहे..
त्याचं असं होतं की सोबत अबीर आणि साबु-साबा, दिर कोइंबतोरला असल्याने तिकडे प्रेक्षणीय काही नसले तरी जायचे हे निश्चित (.. आणि तिकडे अप्रतिम कांचीपुरम साड्या मिळतात हा एक बारिकसा मुद्दा... ज्याने आमचं बजेट कोलमडवलं!).. आमचे साबु साबा हे निसर्गरम्य ठिकाणी.. निवांत दिवसभर आराम करत पडुन रहायचे कॅटेगरीत येत नसल्याने त्यांना बोअर होणार नाही ना? हा धाक, आम्हाला निसर्ग प्रिय तर त्यांना धार्मिक स्थळं..
ह्या इतक्या अटींच्या कचकचाटातुन आलेला प्लान आहे हा. हेक्टीक होताच.. पण आम्ही एन्जॉय केला.. त्यामुळे आता वरचा प्लान असा वाचा...
पुणे - रामेश्वरम (धार्मिक स्थळ)/ धनुषकोडी (सुर्योदय!!)- मदुराई (मंदिर)- कोइंबतोर (दिर + खरेदी) - कुन्नुर (टॉय ट्रेन + थंड हवेच ठिकाण) - बंदिपुर (वाघ!!!)- म्हैसुर (कुठुन तरी ट्रेन पकडायची तर परत खाली का जा? म्हणून बंगलोरला जाताना वाटेतले बघणेबल शहर) - पुणे (व्हाया बंगलोर)
आम्ही रोज एका नव्या जागी गेलो.. पण पुन्हा पुन्हा असं येणं होत नाही म्हणुन हावरटसारखं शक्य तितकं बघायचं होतं.. थोडक्यात २ ट्रिप आम्ही एकीत कोंबल्या.. पण मंडळींचा उत्साह इतका दांडगा की रोज टणाटण उड्या मारत फिरले..!
मंडळी कामाला लागली.. सोबत आबालवृद्ध (मारणार सासुबाई!) लोक असल्याने खायला प्यायला जंगी नेणार होतो सोबत.. सुई-दोर्या पासुन सर्वकाही घेतलं होतं.. शुक्रवारच्या ४ वाजताच्या नागरकोलने आधी मदुराईला जायचा प्लान होता. तिथे मुक्काम ठोकुन रामेश्वरमला जाऊन यायचं होतं. तत्काळमध्ये तिकिटं मिळाली होती..! आम्ही नक्की जात होतो!!
शुक्रवारी घरातुन मोजक्या ८ बॅगा घेऊन निघालो.. रुटीन प्रमाणे सतत "काहीतरी राहिलय" असं वाटत होतंच.. गाडी आली.. बहीणाबाई आणि मांसाहेबांनी जातीने उपस्थिती लावुन खाण्या पिण्याच्या अजुन २ बॅगांची भर घातली!!
वातावरण अत्यंत उत्साही... गाडी निघाली.. मंडळींच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वहात होता!!... रात्र झाली.. खाणे पिणे आटपुन मंडळी आता ताणुन देणार.. की बाजुच्या सहप्रवाशांकडुन बातमी आली... "तामिळनाडुत धुवांधार पाऊस सुरु आहे.. समुद्र किनार्यावर वादळाचा अॅलर्ट आहे..!!"
ही सुवार्ता कानी पडते न पडते तोच... अबीरने "मला घरी जायचय.. आत्ताच्या आत्ता खाली उतरा..." असा टाहो फोडला..
........
त्यारात्री ३ वाजता... नुकत्याच रडुन रडुन झोपलेल्या पोराला मांडीवर जोजवत एक व्यक्ती धनुषकोडीच्या सुर्योदयाचं गणित आता कसं बसवावं ह्याचा विचार करत होती..
.... आणि उत्तर म्हणुन काचेवरुन पावसाचे थेंब ओघळत होते...
क्रमशः

No comments:
Post a Comment